June 2021 Holidays, Festivals & Events: वटपौर्णिमा, योगा डे, पर्यावरण दिन- जून महिन्यात येणाऱ्या सण आणि महत्त्वाच्या दिवसांची संपूर्ण यादी येथे पहा
ज मे महिन्यातील शेवटचा दिवस. उद्यापासून जून महिन्याला सुरुवात होईल. 2021 वर्षातील सहावा महिना अगदी पटकन आला. याच महिन्यात मान्सूनचे देखील आगमन होईल. तसंच इतर महत्त्वाचे दिवस, सण यामुळेही जून महिना महत्त्वपूर्ण आहे.
June 2021 Festival Calendar: आज मे महिन्यातील शेवटचा दिवस. उद्यापासून जून महिन्याला सुरुवात होईल. 2021 वर्षातील सहावा महिना अगदी पटकन आला. याच महिन्यात मान्सूनचे देखील आगमन होईल. तसंच इतर महत्त्वाचे दिवस, सण यामुळेही जून महिना महत्त्वपूर्ण आहे. वटपौर्णिमा (Vat Purnima), पर्यावरण दिन (World Environment Day), आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) यांसारखे सण आणि महत्त्वाचे दिवस जून महिन्यात आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांचा आवडीचा विषय म्हणजे सुट्टया. तर जाणून घेऊया जून महिन्यात येणारे महत्त्वाचे दिवस, सण, सुट्ट्या आणि लॉन्ग विकेंड्स बद्दल...
जून महिन्यातील सण आणि महत्त्वाच्या दिवसांची संपूर्ण यादी:
Sr. No. | Festivals in June 2021 List | Date | Days |
1. | जागतिक पालक दिवस | 1 जून | मंगळवार |
2. | जागतिक दूध दिन | 1 जून | मंगळवार |
3. | कालाष्टमी | 2 जून | बुधवार |
4. | जागतिक सायकल दिन | 3 जून | गुरुवार |
5. | वर्ल्ड रन डे | 3 जून | गुरुवार |
6. | जागतिक पर्यावरण दिन | 5 जून | शनिवार |
7. | वर्ल्ड रनिंग डे | 5 जून | शनिवार |
8. | शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन /अपरा एकादशी | 6 जून | रविवार |
9. | वर्ल्ड सेफ्टी फूड डे | 7 जून | सोमवार |
10. | जागतिक महासागर दिन | 8 जून | मंगळवार |
11. | मासिक शिवरात्री | 8 जून | मंगळवार |
12. | वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे | 8 जून | मंगळवार |
13. | अँटी-चाईल्ड लेबर डे | 12 जून | शनिवार |
14. | महाराणा प्रताप जयंती | 13 जून | रविवार |
15. | वर्ल्ड ब्लड डोनर डे | 14 जून | सोमवार |
16. | फादर्स डे | 20 जून | रविवार |
17. | विश्व शरणार्थी दिवस
(World Refugee Day) |
20 जून | रविवार |
18. | वर्षातील सर्वात मोठा दिवस | 21 जून | सोमवार |
19. | जागतिक योग दिन | 21 जून | सोमवार |
20. | निर्जरा एकादशी | 21 जून | सोमवार |
21. | आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन | 23 जून | बुधवार |
22. | आंतरराष्ट्रीय विधवा दिन | 23 जून | बुधवार |
23. | कबीरदास जयंती | 24 जून | गुरुवार |
24. | वटपौर्णिमा | 24 जून | गुरुवार |
25. | संकष्टी चतुर्थी | 27 जून | रविवार |
26. | आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन | 27 जून | रविवार |
जून महिन्यात 25 हून अधिक सण, उत्सव, राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे दिवस आहेत. परंतु, सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता हे दिवस साजरे करण्यावर काही बंधन येणार आहेत. मात्र वटपौर्णिमा किंवा इतर सण घरच्या घरी अथवा कोविड-19 नियमावलीचे पालन करुन साजरे करता येतील. दरम्यान, जून महिना सुट्ट्या आणि लॉन्ग विकेंडच्या बाबतीत काहीसा नाराज करणार आहे. आठवड्याची ठरलेली सुट्टी वगळता अधिकच्या सुट्ट्या किंवा लॉन्ग विकेंड्सचा आनंद या महिन्यात तरी घेता येणार नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)