Ganpati Sthapana Muhurat 2024 Marathi: गणेश चतुर्थीला या खास शुभ मुहूर्तावर करा मूर्तीची प्रतिष्ठापना, जाणून घ्या योग्य वेळ आणि नियम
गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारीही भाविकांनी पूर्ण केली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्त आपल्या घरी गणपतीची मूर्ती विधीपूर्वक स्थापित करतात आणि विशेष पूजा करतात.
Ganpati Sthapana Muhurat 2024 Marathi: देवांमध्ये पहिला पूज्य असलेल्या गणपती बाप्पाचे 7 सप्टेंबर 2024 (शुक्रवार) रोजी आपल्या भक्तांमध्ये आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारीही भाविकांनी पूर्ण केली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्त आपल्या घरी गणपतीची मूर्ती विधीपूर्वक स्थापित करतात आणि विशेष पूजा करतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पा भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. चला जाणून घेऊया गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या स्थापनेची शुभ वेळ आणि पूजा करण्याची पद्धत… मुहूर्तावर गणेशाची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024 Mehndi Designs: गणेश चतुर्थीला काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन, येथे पाहा
गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त:
गणेश चतुर्थी तिथी 06 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:17 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01:34 वाजता समाप्त होईल.
उदयतिथीनुसार 07 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
पूजेचा शुभ मुहूर्त 07 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 ते दुपारी 01:34 पर्यंत आहे.
गणेश चतुर्थीची पूजा विधी:
गणेश चतुर्थी निमित्त विधी पूर्वक बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी, दरम्यान, जर तुम्हाला पूजा विधी माहित नसेल तर तुम्ही युट्युबवर पूजा विधी व्हिडीओ पाहून विधी पूर्वक सगळी पूजा करू शकता. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्तांनी सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर गणेश स्थापना व पूजेची पूर्ण तयारी करावी. यानंतर शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांना नैवेद्य म्हणून पाणी, फुले, अक्षत, चंदन, दुर्वा, जास्वंदाची फुले, धूप आणि दिवा अर्पण करावा. गणपतीला प्रसाद म्हणून त्यांचे आवडते मोदक, लाडू अवश्य अर्पण करावे. पूजा करताना 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करावा.