August 2019 Festivals Calendar: व्रतवैकल्य आणि सणावारांनी सजलेला असा ऑगस्ट महिना; पहा सणावारांची संपूर्ण यादी

श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य, सणवार असतात.

August 2019 (Photo Credits: Pixabay)

August 2019 Vrat and Festivals List: ऑगस्ट महिन्याची सुरुवात श्रावणाच्या प्रारंभाने होत आहे. श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य, सणवार असतात. हा महिना भगवान शंकराचा प्रिय महिना असल्याचे म्हटले जाते. तर अनेक सणावारांनी युक्त अशा या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, कृष्ण जयंती, बकरी ईद असे विविध सण येत आहेत. याशिवाय अनेक लहान सहान व्रत वैकल्य यांची देखील रेलचेल आहे.

हिंदू परंपरेनुसार, श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवार, शनिवार यांचे विशेष महत्त्व असते. तसंच श्रावणी शुक्रवारी जिवंतिका पूजन केले जाते. या सर्व सणांची तयारी सुरु झाली असेल. तर जाणून घेऊया या ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या सणांची संपूर्ण यादी.

पहा संपूर्ण यादी:

तारीख

दिवस

सण

 2 ऑगस्ट

शुक्रवार

श्रावण महिना प्रारंभ, जिवंतिका पूजन

3 ऑगस्ट

शनिवार श्रावणी शनिवार

5 ऑगस्ट

सोमवार

नागपंचमी, पहिला श्रावणी सोमवार

6 ऑगस्ट

मंगळवार

मंगळागौरी पूजन

9 ऑगस्ट

शुक्रवार

जिवंतिका पूजन

10 ऑगस्ट

शनिवार

श्रावणी शनिवार

12 ऑगस्ट

सोमवार

दुसरा श्रावणी सोमवार, बकरी ईद

13 ऑगस्ट

मंगळवार

मंगळागौरी पूजन

14 ऑगस्ट

बुधवार

नारळी पौर्णिमा

15 ऑगस्ट

गुरुवार

रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट

शुक्रवार

पतेती, जिवंतिका पूजन

17 ऑगस्ट

शनिवार

श्रावणी शनिवार

19 ऑगस्ट

सोमवार

तिसरा श्रावणी सोमवार. संकष्टी चतुर्थी

20 ऑगस्ट

मंगळवार

मंगळागौरी पूजन

23 ऑगस्ट

शुक्रवार

श्रीकृष्ण जयंती, श्रावणी शुक्रवार

24 ऑगस्ट

शनिवार

गोपाळकाला, श्रावणी शनिवार

26 ऑगस्ट

सोमवार चौथा श्रावणी सोमवार

27 ऑगस्ट

मंगळवार

मंगळागौरी पूजन

29 ऑगस्ट

गुरुवार

पिठोरी अमावस्या

30 ऑगस्ट शुक्रवार

पोळा, जिवंतिका पूजन, श्रावण महिना समाप्ती

मंगलमय असा हा श्रावण महिना विविध सण आणि त्या सोबतच आनंद घेऊन येतो. भक्तीरसात न्हावून निघणाऱ्या भक्तांना या महिन्यात देशभक्तीचाही महिमा अनुभवता येतो तो म्हणजे 15 ऑगस्टच्या निमित्ताने. तसंच या महिन्याच्या पहिल्या रविवार फ्रेंडशिप डे देखील साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे सणावारांची रेलचेल असल्याने या महिन्यात सुट्ट्यांचीही चंगळ असते. तर तुम्हीही हा श्रावण महिना आनंदाने साजरा करा. तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif