UP Shocker: उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादात एका मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर निर्माण झालेला तणाव पाहता गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी सांगितले की, अशोक चौबे (60) हे भलुआनी पोलिस स्टेशन हद्दीतील बारीपूर गावात असलेल्या एका मंदिराचे पुजारी असून मंगळवारी रात्री उशिरा त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पुजारी यांना उपचारासाठी महर्षी देवराह बाबा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी सांगितले की, या घटनेच्या संदर्भात पासवानसह तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे आणि घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता मंदिर परिसरात तसेच गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.