Manipur Attack: मणिपूरमधील आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ल्यातील जवानांचे बलिदान विसरणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजनाथ सिंह म्हणाले की, मी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो. दोषींना लवकरच न्यायालयात उभे केले जाईल.
मणिपूरमधील (Manipur) चुराचंदपूर (Churachandpur) येथे शनिवारी झालेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे कर्नल, त्यांची पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा तसेच आसाम रायफल्सचे (Assam Rifles) चार जवान शहीद झाले आहेत. कर्नल बिप्लब त्रिपाठी हे 46वे आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते. देहेंग भागापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर झालेल्या या हल्ल्यात अन्य चार जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मणिपूरच्या चुराचंदपूर येथे आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह असल्याचे ट्विट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी केले आहे. हेही वाचा Militant Attack in Manipur: मणिपूरमध्ये अतिरेक्यांकडून मोठा हल्ला, असम राइफलचे कमांडिग अधिकारी, पत्नी-मुलासह 7 जणांचा मृत्यू
देशाने 46 व्या आसाम रायफल्सच्या सीओसह पाच शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य गमावले आहेत. राजनाथ सिंह म्हणाले की, मी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो. दोषींना लवकरच न्यायालयात उभे केले जाईल.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि आज शहीद झालेल्या जवानांना आणि कुटुंबीयांना मी श्रद्धांजली वाहतो, असे म्हटले आहे. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत.
चुराचंदपूर जिल्ह्यातील सिंगनगट येथील सेहकेन गावात शनिवारी सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या या नापाक कारस्थानात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला पीपल्स लिबरेशन आर्मी जबाबदार असल्याचे मानले जात आहे. त्याची स्थापना 1978 मध्ये झाली, नंतर भारत सरकारने तिला दहशतवादी संघटना घोषित केले. ही संघटना मणिपूरमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर कपटी हल्ले करण्यासाठी ओळखली जाते. बिस्वेसर सिंग यांनी त्याची स्थापना केली होती. पीएलए ही दहशतवादी संघटना स्वतंत्र मणिपूरची मागणी करत आहे.