IPL Auction 2025 Live

Pravin Tarde: विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करणार मनसे, अभिजीत पानसेंनी लिहीली फेसबुक पोस्ट, यावर प्रवीण तरडेंनी दिली अशी प्रतिक्रिया

अशी माहिती अभिजीत पानसे यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) टाकत दिली आहे.

दहीहंडी उत्सव (Photo Credits-Twitter)

मागील एक ते दिड वर्षापासून कोरोनामुळे (Corona Virus) सर्व सणांवर अनेक निर्बंध लावले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी सारखे सण साजरे न करता आल्याने सर्वच सामान्यांमध्ये नाराजी आहे. मात्र अजूनही भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाही सरकारने अनेक निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. मात्र अजूनही गणेशोत्सव आणि दहीहंडी (Handi) नेहमीप्रमाणे साजरा करता येत नाही आहे. या उत्सवादरम्यान होणार गर्दी टाळण्यासाठी सरकारने यावर निर्बंध लावले आहेत. मात्र आता यावर्षी मनसेने  (MNS) दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरा करायची, असे ठरवले आहे. दहीहंडी हा सण अनेकांसाठी आवडता सण आहे. हो सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र कोरोनामुळे यावर मोठे निर्बंध घातले आहेत. मात्र हे सर्व झुगारून मनसेची दहीहंडी धुमधडाक्यात होणार असल्याची माहिती अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी दिली आहे.

आता पुन्हा महाराष्ट्रात गोविंदा रे गोपाळाचा सूर घुमणार आहे. अशी माहिती मनसेने दिली आहे. यावर्षी विश्वविक्रमी दहीहंडीची स्पर्धेचे आयोजन मनसे करणार आहे. अशी माहिती अभिजीत पानसे यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) टाकत दिली आहे. दरम्यान या पोस्टवर नेहमी त्यांच्या वक्तव्यांनी चर्चेत राहणारे प्रसिद्ध अभिनेता प्रविण तरडे (Pravin tarde) यांनी एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही आयोजित केलेल्या या स्पर्धेत मी शंभर टक्के नाचणार आहे. अशी कंमेट त्यांनी पोस्टवर लिहीली आहे.

आता प्रविण तरडेंच्या या कंमेटनंतर त्यांचा मनसेला या स्पर्धेसाठी पुर्ण पाठिंबा आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठेवलेली विश्वविक्रमी दहीहंडी स्पर्धा ही 31 ऑगस्टला होणार आहे. मात्र सर्व सणांवर कोरोनाचे सावट असल्याने ही स्पर्धा पुर्ण होते की नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र सरकार यावर कडक निर्बंध आणून मनसेच्या या आनंदावर विरझण घालण्याचे काम करेल हे पाहण औत्सुख्याचे ठरणार आहे.

pic credit - facebook Screenshot