United Arab Emirates vs United States 2nd T20 Live Streaming: टी 20 तिरंगी मालिकेसाठी यूएई आणि अमेरिका आमनेसामने; जाणून घ्या सामना थेट कधी, कुठे आणि कसा पहाल?
यूएई विरुद्ध युनायटेड संघ यांच्यातील टी 20 तिरंगी मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी खेळवला जात आहे. विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर उभय संघांमध्ये हा सामना होणार आहे.
United Arab Emirates National Cricket Team vs United States National Cricket Team 2nd T20 2024 Tri-Series Live Streaming: संयुक्त अरब अमिराती विरुद्ध युनायटेड स्टेट्स यांच्यातील टी 20 तिरंगी मालिकेचा दुसरा सामना आज म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी खेळवला जात आहे. विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर उभय संघांमध्ये हा सामना होणार आहे. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने नामिबियाचा 40 धावांनी पराभव केला. यासह यूएईने तिरंगी मालिकेत पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, अमेरिकेचा संघ आज यूएईविरुद्ध तिरंगी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. अमेरिकन संघाला विजयाने सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. युएईचे कर्णधार मुहम्मद वसीम यांच्या खांद्यावर संघाची जबाबदारी असेल. तर अमेरिकेचे कर्णधार मॉनक पटेल हे संघाच्या नेतृत्वात उतरणार आहेत. (हेही वाचा:Scotland Women vs Sri Lanka Women Warm-up Match Live Streaming: सहाव्या सराव सामन्यात स्कॉटलंड आणि श्रीलंका आमनेसामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे घ्या जाणून )
UAE vs UAE यांच्यातील तिरंगी मालिकेतील दुसरा टी 20 सामना किती वाजता सुरू होईल?
संयुक्त अरब अमिराती आणि संयुक्त अरब अमेरिका यांच्यातील दुसरा टी 20 सामना 30 सप्टेंबर रोजी विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांना तेथून सामना पाहता येईल. तथापि, आगामी तिरंगी मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित होणार नाही.
दोन्ही संघांचे खेळाडू
यूएसए संघ: स्मित पटेल, अँड्रिस गॉस, मोनांक पटेल (विकेटकीपर), सैतेजा मुक्कामल्ला, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, यासिर मोहम्मद, नितीश कुमार, हरमीत सिंग, अभिषेक पराडकर, उत्कर्ष श्रीवास्तव, अयान देसाई, जुआनोय ड्रायस्डेल
यूएई संघ : अलिशान शराफू, मुहम्मद वसीम (कर्णधार), आसिफ खान, बासिल हमीद, विष्णू सुकुमारन, राहुल चोप्रा, सय्यद हैदर शाह (यष्टीरक्षक), अली नसीर, अयान अफजल खान, जुनैद सिद्दीकी, मुहम्मद जवादुल्ला, ओमिद रहमान, आर्यन शर्मा, मुहम्मद फारुख, राहुल भाटिया
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

