Stock Market Today: शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड; गुंतवणूकदार मालामाल

Indian Stock Market | | (Photo Credits: ANI)

Stock Market Today: शेअर बाजारातील (Stock Market Today)आठवड्याची सुरूवात ऐतिहासिक तेजीत झाली. आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बीएसई सेन्सेक्सने ७५,६७९ अंकांची पातळी गाठली तर निफ्टीही २३,०४३ अंकावर पोहोचला. मिडकॅप निर्देशांकानेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. सकाळच्या सत्रात अदानी समूहाला सर्वाधिक फायदा होताना दिसला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 269.28 अंकांनी वाढून 75,679.67 च्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. एनएससी निफ्टी 86.1 अंकांनी वाढून 23,043.20 चा नवीन उच्चांक गाठला.

टाटा स्टील, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा, ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक हे प्रमुख वधारले. विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती आणि एशियन पेंट्स पिछाडीवर होते. आशियाई बाजारांमध्ये, सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग सकारात्मक व्यवहार करत होते.

सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल 4 जून रोजी घोषित केले जातील. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंड क्रूड 0.21 टक्क्यांनी वाढून USD 82.29 प्रति बॅरलवर पोहोचला आहे. स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारी 944.83 कोटी रुपयांच्या इक्विटी ऑफलोड केल्या. शुक्रवारी BSE बेंचमार्क 0.01 टक्क्यांनी घसरून 75,410.39 वर स्थिरावला. निफ्टीने शुक्रवारी पहिल्यांदा 23,000 चा टप्पा ओलांडला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif