PM Modi on New Education Policy: राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आलेले बदल हे देशाचे उज्ज्वल भविष्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिक्षण क्षेत्रात झालेल्या या बदलाचे स्वागत करत हे देशाचे उज्ज्वल भविष्य असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (National New Education Policy)  झालेल्या बदलांबाबत सविस्तर चर्चा केली. शिक्षण क्षेत्रात झालेल्या या बदलाचे स्वागत करत हे देशाचे उज्ज्वल भविष्य असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तीन-चार वर्षांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षा धोरणात हे बदल केले आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. हे नवे धोरण आल्यानंतर देशात कोणत्याही क्षेत्राकडून वा वर्गाकडून या धोरणाकडे कोणीही बोट दाखवले नाही असेही त्यांनी सांगितले.

यावर अधिक माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज देशभरात या राष्ट्रीय शिक्षणा धोरणाची चर्चा होत आहे. ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, विचारांचे लोक आपापले मत मांडत आहे. या नव्या धोरणांवर रिव्ह्यू देत आहेत. हे एक हेल्दी डिबेट चा विषय आहे. त्यामुळे याची जेवढी चर्चा होईल तेवढा लाभ देशाच्या शिक्षण व्यवस्थेला होईल. आपल्या नॅशनल गोल्सनुसार देशाची शि७ण व्यवस्था आपल्या सध्याच्या आणि येणा-या पिढीसाठी नवे विचार, नवी प्रेरणा देणारी असेल. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल." असेही ते म्हणाले. National Handloom Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा, सोबतच #Vocal4Handmade चा केला प्रचार

यात कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा नुसार विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने यात बदल करण्यात आले आहेत. हे नवे शिक्षण धोरण 21 व्या शतकात नव्या आधुनिक भारताचे निर्माण करणारे आहे, असेही ते म्हणाले. भारतातील टॅलेंट भारतात राहूनच भारताचा विकास करावा यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif