Muslim Women To Build Narendra Modi Temple (Photo Credits: File Images)

मुझ्झफरनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सलग दुसऱ्यांदा सत्तेत येताच एका मागोमाग एक अनेक प्रलंबित ठरावांना मार्गी लावण्याची सुरुवात केली आहे. यातीलच एक उदाहरण म्हणजे तिहेरी तलाक (Triple Talaq). मुस्लिम महिलांच्या  सुरक्षेच्या अनुषंगाने महत्वाच्या अशा या ठरवाला मान्यता मिळताच सर्व स्तरावरून मोदी सरकारचे कौतुक करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझ्झफरनगर (Muzzfarnagar) येथे मुस्लिम महिलांनी मोदींचे आभार मानण्यासाठी चक्क नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्याचे ठरवले आहे. रुबी गजनी (Rubi Ghazani) यांच्या पुढाकाराने हा विचार मांडण्यात आला असून यासाठी मुस्लिम महिला आपल्याकडील साठवून ठेवलेल्या पैशातून खर्च करणार आहेत.

Triple Talaq Bill: तिहेरी तलाक दिल्यास काय होईल शिक्षा? जाणून घ्या ह्या विधेयकाविषयी सविस्तर

IANS च्या माहितीनुसार,कृष्णापुरी या प्रदेशात मोदींचे मंदिर उभारण्यात येणार आहे. रुबी गझनी यांनी मंदिरा बाबत प्रतिक्रिया देताना मोदींनी मुस्लिम महिलांसाठी खूप मोठे पाऊल उचलले आहे असे म्हणत मोदींचे आभार मानले.तिहेरी तलाकच्या निर्णयानंतर त्यांनी मुस्लिम महिलांच्या आयुष्यात खूप बदल आणले आहेत, घरोघरी गॅस पोहचवण्यापासून ते सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टी ते उपलब्ध करून देत आहेत, यापेक्षा जास्त कोणी कशाची अपेक्षा करावी तसेच मोदींना जगभरात विविध अवॉर्ड्सने गौरवले जाते, नक्कीच ते काहीतरी चांगले काम करत असल्यामुळेच त्यांना हे सर्व सन्मान मिळत आहेत, यानुसार त्यांची पूजा जरी केली तरी त्यात गैर ठरणार नाही असेही रुबी यांनी सांगितले आहे.

Triple Talaq Bill: 303 मतांनी 'तीन तलाक विधेयक' लोकसभेत अखेर मंजूर

दरम्यान, मंदिराच्या उभारणीचा प्रस्ताव सध्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला आहे, याला मान्यता मिळताच मंदिराचे काम सुरु होणार आहे. या सर्व प्रकरणात प्रतिक्रिया देताना आम्ही सर्व मोदींच्या बाजूने आहोत त्यामुळे कोणीही त्यांना मुस्लिम विरोधी म्हणून टॅग लावण्याची गरज नाही असे सुद्धा या मुस्लिम महिलांनी सांगितले आहे.