West Bengal Crime: आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून लग्न केले; सत्य समोर येताच महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न

आरोपी हृदय देव बिस्वास आठ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पीडित शम्पा दासला भेटला. भारतीय पोलिस सेवेचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे तिला सांगितले.

West Bengal Crime: आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून लग्न केले; सत्य समोर येताच महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न
Representational picture. Credits: Pixabay

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथे लग्नात फवणूकीची घटना समोर आली आहे. ज्यात एकाने लग्नापूर्वी तरूणीला भारतीय पोलिस सेवा (IPS Officer) अधिकारी असल्याचे खेटे सांगितले. तिच्यासोबत कोर्ट-नोंदणीकृत लग्न केले. काही दिवसांनी पत्नीला फसवणूक झाल्याचे समजताच. तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तिच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हृदय देव बिस्वास आठ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पीडित शम्पा दासला भेटला आणि तिला तो एक उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी असल्याचे(Man Posing as IPS Officer) सांगितले.

तक्रारदार महिलेने आरोप केला की, बिस्वासने तिला फसवून तो खरोखरच एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आहे असे दाखवले. त्यांच्यासोबत ऑनलाइन बोलल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी दोघांनी कोर्ट-नोंदणीकृत लग्न केले. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर, शम्पाला कळले की बिस्वास तिच्याशी खोटे बोलत होता. त्याची खरी ओळख लपवत होता आणि आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत होता. जेव्हा तिने सत्य समोर आणले तेव्हा बिस्वासने तिला छळणे, धमकावणे आणि मारहाण करणे सुरू केले.

तिला त्रास असह्य झाल्यानंतर, शम्पाने रायगंज पोलिसांकडे संपर्क साधला आणि बुधवारी रात्री बिस्वासविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर, पोलिसांनी शुक्रवारी रात्री हृदयदेव बिस्वास यांची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. दरम्यान, महिलेला उपचारासाठी जखमी अवस्थेत रायगंज मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शम्पाची आई सुमित्रा दास यांनी तिच्या जावयाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी सना अख्तर यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2025 05:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).