Maharashtra Weather Update: मुंबईसह पुण्यात उन्हाचा चडता पारा; राज्याची स्थिती आणि हवामान अंदाज

6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे.

Summer Temperature | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई: महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज ६ मार्च २०२६ रोजी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसरात उष्णतेची लाट नसली तरी 'उष्ण आणि दमट' परिस्थितीमुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.

मुंबई हवामान अंदाज:

Mumbai Weather Update- मुंबईमध्ये आज कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान २६ अंशांच्या आसपास नोंदवले जाऊ शकते. कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेचा पिवळा इशारा (Yellow Alert) कायम आहे. आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा उष्णतेची जाणीव जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे हवामान अंदाज

Pune Weather Update- पुणे शहरात आज आकाश निरभ्र असून कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान २०.९ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. कोल्हापूरमध्येही तापमानाचा पारा चढाच राहणार असून दुपारच्या वेळी तापमान ३६ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाची कोणतीही शक्यता नाही.

नाशिक आणि विदर्भ हवामान अंदाज

Nashik Weather Update- नाशिकमध्ये सकाळी हवेत गारवा असला तरी दुपारनंतर तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. नाशिकचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भातील नागपूरमध्ये तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून, येत्या काही दिवसांत येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे.

राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा. वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका बसू नये म्हणून शेतकऱ्यांनी सिंचनाचे नियोजन करण्याचेही सुचवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement