Express Train Delay: नागपूरातील दाट धुक्यांमुळे विविध एक्सप्रेस तब्बल चौदा तास उशीरा, जाणून घ्या कुठल्या ट्रेन किती तास उशीरा
नागपूरहून जाणाऱ्या अनेक रेल्वे सुमारे १ ते १४ तास उशीराने धावत आहे.
नव्या वर्षात राज्यभरातील नागरिकांना चांगलीच हुडहूडी भरली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाची निच्चांकी नोंद झाली असुन महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. तरी या थंडीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या जनजीवनावर होताना दिसत आहे. थंडीमुळे नागरिकांमध्ये सर्दी, पडसा, खोकला ताप असे आजार जडताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात कडाक्याची थंडी पडताना दिसत असली तरी विदर्भात मात्र गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळाताना दिसल्या. तरी आभाळामुळे विदर्भातील विविध शहरांमध्ये दाट धुक्यांची चादर पसरली आहे आणि याच धुक्याचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीस देखील बसला आहे. नागपूरहून जाणाऱ्या अनेक रेल्वे सुमारे १ ते १४ तास उशीराने धावत आहे.
जाणून घ्या विलंबाने धावणाऱ्या गाड्या कुठल्या
- 12261 सीएसटीएम-हावडा, दुरंतो एक्स्प्रेस 14 तास 20 मिनिटे उशिरा
- 12129 पुणे - हावडा आजाद हिंद एक्स्प्रेस 25 तास विलंब
- 12126 हावडा सीएसटीएम प्रगती एक्स्प्रेस 23 तास
- 12622 नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस 10 तास
- 12130 हावडा-पुणे आजाद हिंद एक्स्प्रेस 6 तास
- 06510 बंगळुरू 35 तास
- 03253 पटना-सिकंदराबाद स्पेशल 20 तास
- 2722 हजरत निजामुद्दीन-हैदराबाद 4 तास
- 12649 यशवंतपूर हजरत निजामुद्दीन 1 तास
- 12849 बिलासपूर-पुणे 30 तास
- 12102 शालिमार लोमती ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस 10 तास
- 12834 हावडा-अहमदाबाद 23 तास
- 12833 अहमदाबाद-हावडा 44 तास
(हे ही वाचा:- Railway Crossing Video: अरे देवा! रेल्वे आली आणि फाटक उघडेचं, गेटमॅन गेला झोपी; मुंबईतील लोकल ट्रेन मार्गावरील घटना; Watch Video)
नागपूरातील हवामानामुळे सध्या विविध गाड्या रखडल्या असुन रेल्वेस्थानकावरील प्रतिक्षालयात मोठी गर्दी बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे धुक्यांमुळे लांब पल्ल्यावरील गाड्या रखडल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी मध्य रेल्वे कडून वारंवार आवश्यक त्या सुचना प्रवाशांना दिल्या जात आहे. नागपूर रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची झुंबड बघायला मिळत आहे. तरी या एक्सप्रेस सुमारे १ ते १४ तास उशीराने धावत आहेत.