Assam Accident: आसाममधील गोलाघाटमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, 25 जखमी

बसमध्ये 45 जण प्रवास करत होते. सर्वजण पिकनिकसाठी निघाले होते. मात्र पहाटे 5 वाजेच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली.

Assam Accident: आसाममधील गोलाघाटमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, 25 जखमी

आसाममधील (Assam Accident) गोलाघाट जिल्ह्यात (Golaghat District) प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकाची स्थिती नाजूक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Assam Police) आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसाक गोलाघाट जिल्ह्यातील देरगाव परिसरात हा अपघात झाला आहे.  बसमध्ये 45 जण प्रवास करत होते. सर्वजण पिकनिकसाठी निघाले होते. मात्र पहाटे 5 वाजेच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली.

पाहा पोस्ट -

बसमधील सर्व प्रवासी तिनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात पिकनिकसाठी जात होते. जखमींना सध्या जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात प्राण गमावलेल्या 12 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2024 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).