Delhi Murder Case: धारदार चाकूने वार करून पत्नीचा खून; मृतदेह कारमध्ये सोडून पळून जाणाऱ्या पतीला अटक
खायला पोलिस स्टेशन अंतर्गत एका तरूणाने त्यांच्या पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. राजौरी गीर्डन परिसरात पहाटे 1.20 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी गौतम या आरोपीला संशयास्पद परिस्थितीत अटक केली.
Delhi Murder Case: पश्चिम दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात एका 21 वर्षीय तरूणाने आपल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून(Knife Attack) केला. तसचे तिचा मृतदेह त्याच्या कारमध्ये सोडून पळून जाण्याचा प्रयत्न (Man Murder Wife)केला. पोलिसांनी आरोपीला संशयास्पद परिस्थितीत अटक केली. त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. गौतम (21) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिस परिसरात गस्त घालत असताना तो पोलिसांना पाहून पळण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती पोलिसांनी इंडिया टुडेला दिली. (Hyderabad Hit & Run: हैदराबादच्या वनस्थलीपुरममध्ये हिट अँड रनची घटना, अपघाताचा भीषण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद)
राजौरी गीर्डन परिसरात पहाटे 1.20 वाजता गौतमला संशयास्पद परिस्थितीत शर्टशिवाय फिरताना पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा ही बाब समोर आली. तपासात गौतमने खुलासा केला की, त्याने त्याची 20 वर्षीय पत्नी मान्या हिची हत्या करून तिचा मृतदेह कारमध्ये टाकला होता. (Uttar Pradesh Shocker: लोहिया विद्यापीठात IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; वसतिगृहात सापडला मृतदेह)
रघुबीर नगर येथील रहिवासी असलेल्या गौतमने मार्चमध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय मान्याशी लग्न केले होते. लग्नानंतरही ते आपापल्या कुटुंबासोबतच राहत होते आणि अधूनमधून भेटत होते. रविवारी रात्री गौतम राजौरी गार्डन परिसरात तितारपूर येथे कारमध्ये मान्याला भेटण्यासाठी आला. रात्री 11 च्या सुमारास, मान्याने एकत्र राहण्यास सुरुवात करावी असा आग्रह धरला. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाले. कारमध्येच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात गौतमने मन्यावर चाकूने अनेक वार केले. यात मान्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजौरी गार्डन पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2024 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

