Madhya Pradesh: आईच्या डोळ्यात मिर्ची पूड फेकून अपहरण केलेल्या 6 वर्षीय मुलाला सुखरूप सोडून अपहरणकर्ते पसार
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये काल सकाळी एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते.पोलिसांची कारवाई सुरु असल्यामुळे मुलाला एका ठिकाणी सोडून दरोडेखोर पसार झाले. मुरैना जिल्ह्यातील माता बसई पोलीस ठाण्याच्या बंसीपुरा भागात एका वीटभट्टीजवळ दरोडेखोरांनी मुलाला सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. काल सकाळी मुलाची आई त्याला शाळेत सोडत असताना दोन दरोडेखोरांनी मुलाच्या आईला धक्काबुक्की केली आणि डोळ्यात मिरची पूड टाकून मुलाचे अपहरण केले. यामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये 13 फेब्रुवारी रोजी सकाळी एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे कळल्यानंतर मुलाला गावाच्या बाहेर सोडून अपहरणकर्ते पसार झाले. मुरैना जिल्ह्यातील माता बसई पोलीस ठाण्याच्या बंसीपुरा भागात एका वीटभट्टीजवळ अपहरणकर्त्यानी मुलाला सोडल्याची माहिती समोर आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी मुलाची आई त्याला शाळेत सोडत असताना दोन अपहरणकर्ते तिथे येऊन मुलाच्या आईला धक्काबुक्की करू लागले त्यांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मुलाचे अपहरण केले होते. यामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर ग्वालियर पोलिसांनी 12 तासात मुलाला शोधून काढले आणि मुलाला सुखरूप घरी सोडले. मूल घरी परतल्यानंतर आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
येथे पाहा व्हिडीओ:
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मुलाला सुखरूप परत आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. मात्र, पोलिसांनी मुलाला शोधून काढले. मुलाचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. अपहरणानंतर ग्वाल्हेर, मुरैना आणि भिंड येथील पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारीही मुलाच्या शोधात गुंतले होते. ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली होती. अखेर १२ तासांत मुलगा सुखरूप सापडला.
रिक्षा चालकाने मुलाला रडतांना पहिले आणि काझी बासी गावच्या सरपंचाच्या स्वाधीन केले. सरपंचांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. मुलाला मुरैना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले आणि पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.