Jammu Kashmir Update: जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक

याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने पुष्करमध्ये सक्रिय दहशतवाद्याला अटक केली आहे.

File image of security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बडगाम (Budgam) जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) सक्रिय दहशतवाद्याला (Terrorists) अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने पुष्करमध्ये सक्रिय दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव हमीद नाथ असून तो पेठ जानिगामचा (Peth Janigam) रहिवासी आहे. यावर्षी 26 फेब्रुवारीपासून तो सक्रिय होता. तो लष्कर कमांडर मोहम्मद युसूफ कांट्रोचा जवळचा सहकारी असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी, 16 ऑक्टोबर रोजी काश्मीर झोन पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उमर मुस्ताक खांडे चकमकीत ठार झाल्याचे सांगितले होते.

खांडे यांनी फेब्रुवारी महिन्यात श्रीनगरमधील बाघाट येथे चहा पीत असताना मोहम्मद युसूफ आणि सुहेल आह या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. याने राज्यात इतर दहशतवादी घटना घडवून आणल्या होत्या. पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात प्रदीर्घ चकमकीनंतर पोलिसांनी खांडेला ठार केले आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये पोलिसांनी हिटलिस्ट जारी केल्यानंतर सुरक्षा दल दहशतवाद्यांचा निःपात करण्यात गुंतले आहेत. हेही वाचा Priyanka Gandhi On PM Modi: पंतप्रधानांनी कोट्यवधी भारतीयांच्या वेदना असंवेदनशीलतेच्या बुटाखाली चिरडू नका, प्रियांका गांधींची खोचक टीका

सुरक्षा दलांच्या हिटलिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या इतर दहशतवाद्यांमध्ये सलीम परे, युसूफ कांट्रो, अब्बास शेख, रियाझ शेटगुंड, फारुख नली, जुबेर वानी, अशरफ मोलवी, साकिब मंजूर आणि वकील शाह यांचा समावेश आहे. त्याच वेळी, बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद दहशतवादी कमांडर यासिर पारे आणि एक परदेशी दहशतवादी मारला गेला. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कसबायर भागात ही चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक JeM कमांडर आणि IED तज्ञ होता. आयजीपी यांनी ट्विट केले की, प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि आयईडी तज्ञ यासिर पारे आणि विदेशी दहशतवादी फुरकान मारले गेले आहेत. दोघेही अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभागी होते. हे मोठे यश आहे.