Jammu and Kashmir: काश्मीरमधील बारामुल्ला येथे ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप

अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले की, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले की, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू ३४.३२ अंश उत्तर अक्षांश आणि ७४.४१ अंशपूर्व रेखांशावर पाच किमी खोलीवर होता.