Aadhaar-PAN Linking: आधार-पॅन कार्ड जोडण्यासाठी CBDT ची सहा महिन्यांची मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत लिंक करण्याची संधी
केंद्रीय कर संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आता 30 सप्टेंबर 2019 पर्यंत आधार-पॅन लिंक करु शकता.
आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर संचालक मंडळाने (Central Board of Direct Taxes) दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आता 30 सप्टेंबर 2019 पर्यंत आधार-पॅन लिंक करु शकता. मात्र 1 एप्रिलपासून इनकम रिटर्न फाईल करताना पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. यापूर्वी पॅन-आधार कार्ड जोडण्याची तारीख 31 मार्च 2019 होती. नागरिकांच्या सुविधेसाठी यात सहा महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे.
ANI ट्विट:
.
आधार-पॅन घरबसल्या लिंक कसे कराल?
सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा. डाव्या बाजूला असलेल्या 'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक केला. तुमचे अकाऊंट नसल्यास प्रथम रजिस्टर करा. लॉगइन केल्यानंतर ओपन झालेल्या पेजवरुन प्रोफाईल सेटिंगचा पर्याय निवडा. त्यानंतर आधार कार्ड लिंकचा पर्याय निवडा. यात आधार कार्डची माहिती आणि कोड भरा. त्यानंतर 'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक करा.
पहा व्हिडिओ:
SMS द्वारेही करु शकता लिंक
SMS सेवेचा लाभ घेण्यासाठी 567678 किंवा 56161 या नंबरवर मेसेज पाठवून आधार आणि पॅन कार्ड लिंक करु शकता.