India-Thailand Highway: आता भारतामधून रस्तेमार्गाने थायलंडला जाता येणार; कोलकाता-बँकॉक महामार्ग येत्या 4 वर्षात सुरू होण्याची शक्यता

जसजसा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होत जाईल, तसतसे भारत आणि थायलंडमधील पर्यटन वाढेल असा अंदाज आहे.

Highway (Photo Credit: Pixabay)

लवकरच रस्ते मार्गाने भारतामधून थायलंडला (Thailand) प्रवास करता येणार आहे. भारत आणि थायलंडमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने एक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प असलेला कोलकाता-बँकॉक महामार्ग (Kolkata To Bangkok Highway) येत्या चार वर्षांत लोकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. अनेक देशांमध्ये पसरलेला हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या रस्त्यामध्ये प्रदेशात वाहतूक आणि व्यापारात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. या महामार्गामुळे अनेक देशांमध्ये अखंड प्रवास आणि आर्थिक वाढ सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.

कोलकाता-बँकॉक महामार्गाचे बांधकाम हे भारत आणि थायलंडमधील संपर्क वाढवण्याच्या आणि व्यापार संबंध मजबूत करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल. भारतातील कोलकाता ते थायलंडमधील बँकॉकला जोडणाऱ्या हा महामार्गाद्वारे अनेक देशांमधले कार्यक्षम रस्त्यांचे जाळे निर्माण करणे हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश आहे. हा महामार्ग पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर, प्रदेशातील व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक मोठ्या संधी निर्माण होतील.

महामार्गाचे विविध भाग सध्या बांधकामाधीन आहेत व त्यामध्ये लक्षणीय प्रगती होत आहे. हा महामार्ग वेळेवर पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकारी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. कोलकाता-बँकॉक महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या भागातील व्यापार आणि आर्थिक वाढीवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि थायलंड दरम्यान थेट आणि कार्यक्षम रस्ता जोडणी प्रस्थापित करून, वाहतूक वेळ आणि वस्तूंच्या खर्चात लक्षणीय घट होईल. ही वर्धित कनेक्टिव्हिटी द्विपक्षीय व्यापाराला चालना देईलच, यासह सीमापार गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल आणि महामार्ग असलेल्या भागात आर्थिक विकासाला चालना देईल. (हेही वाचा: न्यूडिस्ट बीचवर सेक्स करणाऱ्यांमुळे शहरातील लोक त्रस्त; प्रशासनाने जारी केला अलर्ट; समुद्र किनाऱ्यावर शारीरिक संबंध न ठेवण्याचे आवाहन)

या महामार्गाकडे फक्त एक व्यापारी मार्ग म्हणून पाहिले जात नाही, तर या मार्गाद्वारे दोन्ही देशांमधील पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याची अपेक्षाही आहे. जसजसा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होत जाईल, तसतसे भारत आणि थायलंडमधील पर्यटन वाढेल असा अंदाज आहे. महामार्गाचा सर्वात लांब भाग भारतातून मोरे, कोहिमा, गुवाहाटी, श्रीरामपूर, सिलीगुडी ते कोलकाता असा जाईल. एकूण 2,800 किमी पेक्षा जास्त अंतराच्या या महामार्गाचा सर्वात लांब पट्टा भारतात असेल, तर सर्वात लहान भाग थायलंडमध्ये असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif