UPSC Mobile App: लोकसेवा आयोगाकडून मोबाइल अॅप लॉंच; परिक्षा, पदभरती संदर्भात मिळणार एका क्लीकवर अपडेट

“केंद्रीय लोकसेवा आयोगाने मोबाइलद्वारे परीक्षा आणि भरती संबंधित सर्व माहिती ऍक्सेस करण्यासाठी Google Play Store वर UPSC android अॅप लाँच केले आहे.

लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service Commission) परिक्षेसाठी अर्ज (Application For Examination) करणाऱ्या उमेदवारांच्या सुविधेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नवीन मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च (Launch) करण्यात आले आहे. लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in या वेबसाइटवर (Website) ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. परिक्षा आणि भरती-संबंधित माहिती आता फक्त एका क्लीकवर (Click) तुम्हाला मिळवता येणार आहे. तसेच नव्याने लाँच करण्यात आलेल्या हे अॅनरॉइड मोबाईल (Android Mobile) धारकांना सहज वापरता येणार आहे. कारण हे अॅप्लिकेशन (Application) Google Play store वर उपलब्ध आहे. तरी या अपच्या माध्यमातून फक्त परीक्षा (Examination) आणि भरतीसंबंधी (Recruitments) माहिती मिळू शकणार आहे. या अपद्वारे उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही अर्ज भरायचा असल्यास लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अधिकृत संकेतस्थाळावर जावून भरता येईल.

 

जाणून घ्या कसं डाऊनलोड कराल हे अॅपलीकेशन :-  

 

विविध माध्यमातून प्रदर्शित केली जाणारी माहिती तसेच विद्यार्थ्यांना (Students) होणारे गैरसमज (Misunderstanding) दूर करण्यासाठी एकाच व्यासपीठावर अचूक माहिती देण्याकरीता हे अॅप लॉंच करण्यात आले आहे. या अॅपवर परिक्षा तसेच पदभरती संबंधीत अपडेट्स जारी करण्यात येईल. https://www.upsc.gov.in/content/upsc-mobile-app या लींकवर क्लीक करत तुम्हाला हे अॅप सहज तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येईल. “केंद्रीय लोकसेवा आयोगाने मोबाइलद्वारे परीक्षा आणि भरती संबंधित सर्व माहिती ऍक्सेस करण्यासाठी Google Play Store वर UPSC android अॅप लाँच केले आहे.