Chandipura Virus: मेंदूवर हल्ला करणारा चांदीपुरा विषाणू अतिशय धोकादायक, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

गुजरातमधील चांदीपुरा व्हायरसची वाढती प्रकरणे आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे चिंतेमध्ये वाढ झाली आहे. 1965 मध्ये पहिल्यांदा दिसलेला चांदीपुरा व्हायरस पुन्हा एकदा कहर करत आहे. गेल्या दोन आठवड्यात या विषाणूमुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील 12 जिल्ह्यांमध्ये हा विषाणू पसरला आहे.

Virus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Chandipura Virus: गुजरातमधील चांदीपुरा व्हायरसची वाढती प्रकरणे आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे चिंतेमध्ये वाढ झाली आहे. 1965 मध्ये पहिल्यांदा दिसलेला चांदीपुरा व्हायरस पुन्हा एकदा कहर करत आहे. गेल्या दोन आठवड्यात या विषाणूमुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील 12 जिल्ह्यांमध्ये हा विषाणू पसरला आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. चांदीपूर व्हायरसमुळे अरवली साबरकांठामधील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

चांदीपुरा व्हायरस म्हणजे काय?

चांदीपुरा विषाणू हा आरएनए विषाणू आहे, जो सामान्यतः मादी फ्लेबोटोमाइन माशीद्वारे पसरतो. हे डास, माश्या आणि कीटकांद्वारे पसरते. डासांमध्ये आढळणारा एडिस हा त्याच्या प्रसारास कारणीभूत आहे. महाराष्ट्रात 1966 मध्ये पहिल्यांदाच यासंबंधीचे प्रकरण समोर आले. नागपूरच्या चांदीपूरमध्ये या विषाणूची ओळख पटली, म्हणून त्याला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आले. त्यानंतर 2004 ते 2006 आणि 2019 मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला. चंडीपुरा विषाणूचा सर्वाधिक बळी १५ वर्षांखालील मुले आहेत. या वयातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. चांदीपुराच्या उपचारासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस नाही.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती?

चांदीपुरा विषाणूमुळे प्रथम ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. चांदीपुरा विषाणूमुळे, रुग्णाला ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि पेटके येतात. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस होतो. एन्सेफलायटीस हा एक आजार आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते. काही रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणेही दिसून आली आहेत. या आजाराने बाधित बालकाच्या मेंदूला सूज येते.

चांदीपुरा विषाणू अतिशय धोकादायक 

चांदीपुरा व्हायरसमुळे 100 पैकी 70 मुलांचा मृत्यू होऊ शकतो. यामध्ये मृत्युदर 56 ते 70 टक्के आहे. या विषाणूमुळे मृत्यू फार कमी वेळात म्हणजेच २४ ते ४८ तासांत होऊ शकतो. त्याचा मेंदूवर फार लवकर परिणाम होतो. यामुळे मूल कोमात जाऊन त्याचा मृत्यूही होऊ शकतो.

अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा

चांदीपुरा विषाणू टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या. स्वच्छता खूप महत्वाची आहे. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. माशी- डास टाळा. लक्षणे दिसताच ताबडतोब रुग्णालयात जा.

चांदीपुरा व्हायरस उपचार

चांदीपुरा विषाणूसाठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार किंवा लस नाही. प्रतिबंध आणि समजून घेऊनच चंडीपुरा थांबवता येईल. शरीराला हायड्रेट करणे सर्वात महत्वाचे आहे, विशेषत: उलट्या झाल्यास. ताप कमी करण्यासाठी औषधे घेतली जाऊ शकतात. लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना विलंब न करता रुग्णालयात दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now