Centre Conspiring Against Arvind Kejriwal: केंद्र सरकारकडून अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आप नेते सौरभ भारद्वाज यांचा आरोप
तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा दावा आणि त्याचा पुरवाला त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
Centre Conspiring Against Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिराह जेलमध्ये मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप 'आप'ने रविवारी केल्यानंतर पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या कामकाजावर आणि भाजपवर ताशेरे ओढले आहेत. तिराहमध्ये सर्व सोयीसुविधा, तज्ञ डॉक्टरांची मोठी फौज असलेला भाजपचा दावा खोटा असल्याचं सांगत त्यांनी तिहारचे डीजी यांचे एम्सला पाठवलेले डॉक्टरांच्या मागणी पत्र सर्वांसमोर ठेवले आहे.
तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालवत जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना इन्सुलिनची गरज असूनही त्यांना ते दिले जात नसल्याचा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल हे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त आहेत. तिहार जेलमध्ये इन्सुलिनची कमतरता आहेत. ते त्यांना मिळत नाही. त्याशिवाय त्यांना चांगल्या मधुमेह तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. तो त्यांनी दिला जात नाही. तुम्ही डॉक्टर देऊ शकत नसला तर, व्हिडीओ कॉलद्वारे आम्ही खासगी डॉक्टर उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले. मात्र, त्यांची ती मागणीही पूर्ण करण्यात आली नाहीये.
माध्यमांशी संवाद साधताना भारद्वाज यांनी तिहार जेलचे महासंचालक आणि एम्स यांच्यात मधुमेह तज्ज्ञांच्या गरजेबाबत नुकत्याच झालेल्या पत्र व्यवहाराचा पुरावा सादर केला. युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले की, भाजपकडून वारंवार सांगण्यात आलं की त्यांच्याकडून तिहार जेलमध्ये चांगले डॉक्टर ठेवण्यात आले आहेत. असं असेल तर दुसऱ्या डॉक्टरची मागणी का करण्यात आली? म्हणजे त्यांचा तो दावा खोट ठरला. त्याशिवाय, जो डॉक्टर जेलमध्ये आहे. त्याची कोणत्या निकषांवर तेथे नेमणूक करण्यात आली हा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.
कथित दारू घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 21 मार्च रोजी अटक केलेले केजरीवाल तुरुंगाच टाकले आहेत. ते 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल यांच्या साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढल्याचा आरोप आप नेते आतिशी यांनी केला होता.