Jammu-Kashmir Update: पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Security forces (Pic Credit - - ANI Twitter)

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये (Pulwama) सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी येथे तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी संघटना लष्कर-ए तैयबा (LeT) शी संबंधित होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे ठार झालेले तीन दहशतवादी स्थानिक असून ते लष्करशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेले तीन दहशतवादी स्थानिक होते आणि ते पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. माहिती देताना काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले की, हे तिन्ही दहशतवादी स्थानिक होते आणि ते पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. यातील एक दहशतवादी जुनैद शेरगोजरी असे असून तो जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस अधिकारी रियाझ अहमद ठोकर यांच्या हत्येमध्ये सामील होता. हेही वाचा Malaria Cases In Mumbai: मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत आढळले 57 रुग्ण

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अन्य दोन दहशतवाद्यांची नावे फाजील नजीर भट आणि इरफान आह मलिक अशी आहेत, ते पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल आणि एक पिस्तूल, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.