Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशात मामाने चार वर्षांच्या भाचीवर केला बलात्कार

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. तिरुपती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एल सुब्बारायुडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मामा नागराजू (24) याने शुक्रवारी संध्याकाळी तिला एएम पुरम गावातील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.

प्रतिकात्मक प्रतिमा File Image

Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर तिच्या दूरच्या नातेवाईकाने बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. तिरुपती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एल सुब्बारायुडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मामा नागराजू (24) याने शुक्रवारी संध्याकाळी तिला एएम पुरम गावातील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, “नागराजू मुलीच्या घराजवळ राहतो आणि दररोज तिच्यासोबत खेळत असे. काल (शुक्रवारी) संध्याकाळी तो तिला एका दुकानात घेऊन गेला आणि तिथून काही खाद्यपदार्थ आणले. यानंतर तो मुलीला घरापासून दूर एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला, तेथे त्याने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. हे देखील वाचा: MP Shocker: मध्य प्रदेशातील भिंडमध्ये स्वयंपाक करताना गरम तेलाच्या कढईत पडला मोबाईल, स्फोट झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू
अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. रात्री नऊच्या सुमारास एका सरकारी शाळेजवळ मुलीचा मृतदेह सापडला. अधिकाऱ्याने सांगितले की, नागराजू यांच्या विरोधात बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिरुपती एसपी म्हणाले की, ते या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याची विनंती करणार आहेत.