Bigg Boss Marathi 2, August 26, Episode 93 Update: बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकले आऊट, टॉप 6 सदस्य लढणार विजेतेपदासाठी

यावेळी जड अंतःकरणाने सदस्यांसह बिग बॉसने सुद्धा भावुक होऊन त्यांना निरोप दिला.

Bigg Boss Marathi 2, Episode 93 (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या खेळातील कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle)  हे आज घरातून बाहेर पडले. यावेळी जड अंतःकरणाने सदस्यांसह बिग बॉसने सुद्धा भावुक होऊन त्यांना निरोप दिला. त्यामुळे बिचुकले आणि सदस्य हे भांडणाचं समीकरण आज मात्र बऱ्याच अंशी भावनिक पाहायला मिळालं . आजच्या भागात घरातील सदस्यांना शेवटचा टास्क दिला होता, 'अभिजित बिचुकले' नामक या टास्क मध्ये सदस्यांनी आपल्याला उमगेलले बिचुकले मांडायचे होते. बिग बॉसने नेमून दिल्याप्रमाणे यात आरोहने बिचुकलेची मुलाखत घेतली आणि इतर सदस्यांनी एक एक करत आपल्या कलेतून बिचुकले चित्रित केले. यानंतर बिग बॉसने बिचूकलेंचा खेळातील प्रवास मांडणारी एक झलक दाखवली. दरम्यान कालच्या भागात इतर सदस्यांना देण्यात आलेल्या गोल्डन पाटी ऐवजी सिल्व्हर पाटी मिळाल्याने बिचुकले यांचा प्रवास तिथेच संपतो.

आजच्या वास्तविक बिचुकले विशेष भागात सुरुवातीपासूनच सदस्य त्यांचे कौतुक करत होते. यात एरवी त्यांच्याशी 36 चा आकडा असलेली वीणा देखील बिचुकले हे घरातील मनोरंजनाचा धमाका आहेत अशा आशयाचे वाक्य म्हणाली. तर शिवानी, नेहा, किशोरी याही त्यांची स्तुती करताना दिसल्या. यानांतर बिग बॉसच्या सूचनेनुसार एक टास्क सोपवण्यात आले होते. यात अभिजित बिचुकले यांची आरोह मुलाखत घेतो. ज्यात बिचुकले अनेक खुलासे करत सर्वाना आश्चर्यचकित करतात. "आतापर्यंत 18 वर्षात मी केस कापलेले नाहीत, आपल्या पत्नी समवेत चित्रपट पहिला नाही" या विधानांवर तर इतर सदस्य अवाकच होतात.

टास्क दरम्यान, शिव आणि वीणा यांचा डान्स, किशोरी यांची लावणी आणि नेहाने बिचुकलें वर केलेली कविता अशी भन्नाट सादरीकरणे होतात. टास्क संपातच बिग बॉस देखील बिचुकले यांची स्तुती करत तुम्ही निरपेक्ष आणि निर्मळ मनाने खेळलात अशी दाद देतात, यानंतर त्यांचं खेळाची एक झलक दाखवली जात ज्यावर सर्वच सदस्यांच्या डोळ्यात पाणी येते.

दरम्यान, बिग बॉस बिचुकले यांना फिनाले तिकीट न देता घरातले वास्तव्य संपल्याचे सांगतात. यानंतर घरातील सर्वच सदस्य रडू लागतात. या प्रवासादरम्यान कित्येकदा सदस्यांनी बिचुकले यांना गंमत म्हणून बाथरूममध्ये कोंडल्याचे आपणही पहिले असेल आज पुन्हा एकदा त्यांना शेवटचे कोंडून बाकी सर्व सदस्य रडत असतात, मात्र यावेळी बिचुकले यांचाही बांध फुटतो. अखेरीस बिग बॉसच्या घराला रामराम करून बिचुकले घरबाहेर पडतात. यापुढील पाच दिवसात घरात शिव , वीणा, नेहा, शिवानी, किशोरी आणि आरोह हे अंतिम विजेत्यापदासाठी लढताना पाहायला मिळणार आहेत. या लाढतेते नेमकी कोण बाजी मारताय हे पाहण्यासाठी बघत रहा आपला मराठी बिग बॉस सीझन 2!