Bigg Boss Marathi 2, 6 July , Episode 42 Updates: नेहाच्या टीममध्ये पडली फूट? अभिजतने टीका करत दिले आपले स्पष्टीकरण

त्यावेळी पहिल्या सीझन मधील काही सदस्यांनी येथे उपस्थिती लावली होती. मात्र या टास्कदरम्यान स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली. तसेच नेहाच्या टीममधील काही सदस्यांना टास्कवेळी तिने घेतलेले निर्णय पटले नसल्याने त्यांच्यामध्ये फूट पडण्याचे चित्र दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातील सदस्यांना बीबी हॉटेल हा टास्क देण्यात आला होता. त्यावेळी पहिल्या सीझन मधील काही सदस्यांनी येथे उपस्थिती लावली होती. मात्र या टास्कदरम्यान स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली. तसेच नेहाच्या टीममधील काही सदस्यांना टास्कवेळी तिने घेतलेले निर्णय पटले नसल्याने त्यांच्यामध्ये फूट पडण्याचे चित्र दिसून येत आहे. तर नेहा दुसऱ्या ठिकाणी सुरेखा पुणेकर यांच्यासोबत टास्क दरम्यान आपण कशा पद्धतीने स्टार मिळवण्यासाठी कष्ट केले याची बतावणी करताना दिसून येते. तर वीणा आणि रुपाली यांच्यामध्ये झालेल्या वाद मिटत असल्याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. ( वीणा आणि रुपालीमध्ये शिववरुन खटके उडताना  दिसले.) घरात किशोरी शहाणे एकट्या बसलेल्या दिसून आल्या.

(हेही वाचा-Bigg Boss Marathi 2, Episode 41 Preview: बिग बॉस हॉटेलमधून अतिथीबाहेर पडल्यानंतर घरातील सदस्यांमधील हेवेदावे येणार समोर; सुरेखा पुणेकर यांना अश्रू अनावर)

त्यानंतर महेश मांजरेकर यांची एन्ट्री झाल्यानंतर सदस्यांना बीबी हॉटेलच्या टास्कबद्दल विचारतात. तसेच हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या अतिथींबद्दल तुम्हाला काय वाटते त्याची विचारतात.  तर अतिथींनी हॉटेलमध्ये केलेल्या उपद्रवांमुळे घरात केलेल्या नुकसानाबद्दल त्यांना धडा शिकवायचा असा सल्ला देतात. माधव कॅप्टन असल्यामुळे त्याच्या खोलीचीसुद्धा दुराव्यस्था झाली. नेहा परागची जागा घेत असल्याचे महेश मांजरेकर तिला बोलून दाखवतात. बिग बॉसने दिलेल्या एका टास्कदरम्यान घरातील सदस्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक सदस्याने अन्य सदस्यांना त्यांच्या एकूणच वागणूक किंवा टास्कवेळचा सहभागासह अन्य गोष्टींच्या आधारे गुण दिले. मात्र टास्कवेळी दोन गट पाडण्यात आले होते.

नेहमीच्याच प्रमाणे नेहाच्या टीमने दुसऱ्या टीमच्या सदस्यांना अत्यंत कमी गुण दिल्याने महेश मांजरेकर  त्यांच्यावर भडकलेले दिसून आले. तर शिव उत्तम खेळल्याने त्याला महेश सर शाबासकी देतात. मात्र पुन्हा त्याच टास्कदरम्यान दिलेल्या गुणांची उजळणी करत त्यांच्या मतानुसार महेश मांजरेकर  गुण देतात.  वीणा आणि शिव हे दोघे या टास्कचे मानकरी ठरतात. तसेच किशोरी आणि सुरेखा यांच्यामध्ये वयावरुन वाद होतात.

वीणाने माधव बद्दल केलेल्या कमेंटबद्दल सुनावतात. त्यामुळे वीणाने दुसऱ्यांबद्दल असे बोलताना विचार करावा असे म्हणातात. त्यानंतर महेश मांजरेकर किशोरीकडे वळतात आणि ती एकटी का राहत आहे असल्याचे विचारतात. यावर किशोरी आपले स्पष्टीकरण देतात आणि वीणाला या स्थितीबद्दल वाटत असलेल्या गोष्टीबद्दल तिचे मत व्यक्त करते.