Serum Institute Shares in Dharma Production: अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये मोठी गुंतवणूक; धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स घेणार, 1000 कोटींची डील

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये अदर पुनावाल 50 टक्के भागीदारी विकत घेणार आहे.

Adar Poonawalla | (Photo Credits-Facebook)

Serum Institute Stakes in Dharma Production : अदर पुनावाला (Adar Poonawalla) आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील 1000 कोटींमध्ये होत असल्याची माहिती आहे. वॅक्सिन मेकर सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे. धर्मा प्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीमधील मोठी कंपनी आहे. त्यामुळे त्यात हिस्सेदारी घेत आता अदर पुनावाला फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

आज म्हणजेच सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी कंपनीने ही माहिती दिली. या डीलनंतर अदर पुनावाला यांची करण जोहरच्या धर्मामध्ये जवळपास 50% हिस्सेदारी असेल. सध्या, करण जोहर यांच्याकडे धर्माचा 90.7% हिस्सा आहे. त्यांच्या आई हिरू यांच्याकडे 9.24% हिस्सा आहे. करारानंतरही करण जोहर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहतील. अपूर्व मेहता याही सीईओ राहतील. (Prince Narula-Yuvika Chaudhary: बिग बॉस फेम प्रिन्स नरुला बनला बाप, पत्नी युविका चौधरीने दिला मुलीला जन्म\)

धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स घेणार

पूनावाला यांच्या गुंतवणुकीमुळे धर्म आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल

बॉलिवूड जगतात सध्या झपाट्याने बदल होत आहे. चित्रपटांचा दर्जा बदलत आहे. मनोरंजन उद्योगात प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादन पद्धती येत आहे. सामग्री निर्मिती, वितरण आणि प्रेक्षक प्रतिबद्धता बदलणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. पूनावाला यांच्या गुंतवणुकीमुळे धर्म आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. हा या गुंतवणूकीमागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

वारसा नव्या उंचीवर नेईल

'धर्मा हा नेहमीच हृदयस्पर्शी कथा-कथनासाठी ओळखला जातो. अदार, एक जवळचा मित्र आणि दूरदर्शी आहे. आम्ही धर्माचा वारसा नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहोत.' असे मत करण जोहरणे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

प्रॉडक्शन हाऊससोबतच्या भागीदारीमुळे आनंदी

दुसरी आदर पूनावाला यांनी या गुंतवणूकीवर आनंद व्यक्त केला. 'मित्र करण जोहरसोबत आपल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसमध्ये भागीदारी करताना मला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की येत्या काही वर्षांत आणखी उंची गाठू.'

1976 मध्ये धर्मा प्रोडक्शनची स्थापना

धर्मा प्रॉडक्शनची स्थापना 1976 मध्ये यश जोहर यांनी केली होती.नंतर करण जोहरने प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी घेतली. धर्मा प्रॉडक्शनने कभी खुशी कभी गम, ये जवानी है दिवानी आणि 2 स्टेट्स सारख्या ब्लॉकबस्टरसह 50 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आलिया भट्ट आणि वरुण धवनसह अनेक स्टार किड्स आणि तरुण कलाकारांना लॉन्च करण्यात आले.