नववर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूडमधील इतर सेलिब्रेटींप्रमाणे मालदीव्सला न जा Sonakshi Sinha ने भारतातील 'हे' नयनरम्य ठिकाण, See Pics
भारतातील हे सुंदर ठिकाण आहे 'केरळ' (Kerala). सोनाक्षी सिन्हा आपले थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत केरळमध्ये जाऊन छान सेलिब्रेट केली. अतिशय शांत आणि प्रसन्न अशा ठिकाणी तिने एकांतात छान वेळ घालवला.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्ट (31st December) आणि नववर्षाचे सेलिब्रेशन (new Year Celebration) करण्यासाठी मुंबईकरांवर प्रचंड निर्बंध आले. त्यातच नाइट कर्फ्यू देखील घोषित करण्यात आला होता. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी (Bollywood Stars) अनेकांनी मुंबईबाहेरचा तर काहींनी देशाबाहेरचा रस्ता पकडला. यात कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, इशान खट्टर, अनन्या पांडेसह अनेक कलाकारांनी मालदीव्सची वाट धरली. अनेकांनी देशाबाहेर जाऊन नववर्षाचे जंगी सेलिब्रेशन केले. यात अनेकांची पहिली पसंती ही मालदीव्सच होती. मात्र बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ने मात्र आपल्या भारतातच राहून भारतातील समुद्रानी वेढलेल्या एका नयनरम्या ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले. याचे फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले.
भारतातील हे सुंदर ठिकाण आहे 'केरळ' (Kerala). सोनाक्षी सिन्हा आपले थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत केरळमध्ये जाऊन छान सेलिब्रेट केली. अतिशय शांत आणि प्रसन्न अशा ठिकाणी तिने एकांतात छान वेळ घालवला.
तिने आपले केरळमधील हे फोटोज शेअर केले असून या फोटोखाली 'देवांचा स्वत:चा देश' असे कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- Ananya Pandey Hot Photos: मालदीवमध्ये नववर्षाचे सेलिब्रेशन करत असलेल्या अनाया पांडेच्या हॉट फोटोज सोशल मिडियावर लावली आग
या फोटोजमधून सोनाक्षी आपली सुट्टी केरळमध्ये छान एन्जॉय करताना दिसत आहे. रोजच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सोनाक्षी केरळमधील समुद्रांचा, हाऊस बोट मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
ते इतरांप्रमाणे अन्य देश न निवडता भारतातील या सुंदर ठिकाणी नववर्षाचे सेलिब्रेशन केल्यामुळे चाहतेही खूश आहेत. सोनाक्षीप्रमाणे रणबीर कपूर आणि त्याचे कुटूंब, आलिया भट, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण यांनी राजस्थानमधील रणथंबोर मध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)