Lucky Ali ने चाहत्यांसाठी गोव्याच्या Arambol Beach वर गायले 'O Sanam' सॉन्ग (Watch Video)
90 व्या दशकात लकी अलीने आपल्या पॉप सॉन्गने रसिकांची मने जिंकली. दरम्यान, आता लकी अलीचा लाईव्ह सिंगिंग व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Lucky Ali O Sanam Song Video: सुप्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर हिट ठरत आहे. 90 व्या दशकात लकी अलीने आपल्या पॉप सॉन्गने रसिकांची मने जिंकली. दरम्यान, आता लकी अलीचा लाईव्ह सिंगिंग व्हिडिओ (Live Singing Video) व्हायरल होत आहे. त्यात तो आपले लोकप्रिय गाणे 'ओ सनम' (O Sanam) गात आहे. लकी अली ला प्रत्यक्ष गाताना पाहण्याचा, ऐकण्याचा अनुभव उपस्थित चाहत्यांनी घेतला. लकी अलीच्या आवाजातील गाण्याचे unplugged version ऐकणे हा अगदी सुखद अनुभव आहे. या व्हिडिओतून तो तुम्हीही घेऊ शकता.
लकी अली चा हा व्हिडिओ गोव्याच्या Arambol Beach वरील आहे. अनेक युवा चाहते लकी अली भोवती बसले आहेत आणि लकी अली गिटार हातात घेऊन गाण्याचा आनंद त्यांना देत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 4 लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत आणि सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेत्री नफीसा अली ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "Arambol मधील गार्डन ऑफ ड्रिम्स मधून लकी अली लाईव्ह."
पहा व्हिडिओ:
उपस्थित चाहत्यांच्या चेहऱ्यावर गाण्याचा आनंद पाहायला मिळत आहे. दरम्यान, रिमिक्स आणि रिक्रिएटेड गाण्यांच्या जमान्यात लकी अली च्या या लाईव्ह परफॉर्मेन्सला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून लकी अली गोव्यात असून अभिनेत्री नफीसा त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत आहे.