Irrfan Khan Dies: इरफान खान यांना 'या' एका व्यक्तिसाठी जगायची इच्छा होती; शेवटच्या Interview मध्ये सांगितलेल्या गोष्टी वाचा
या सिनेमाच्या निमित्ताने इरफान यांनी एक शेवटचा इंटरव्ह्यू दिला होता ज्यात त्यांनी आपण या आजाराशी लढत आहोत कारण एका व्यक्तीसाठी आपल्याला जगायची इच्छा आहे असे म्हंटले होते.
बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irfan Khan) यांनी आज वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) शेवटचा श्वास घेतला. मागील दोन वर्षांपासून neuroendocrine tumour या अतिशय गंभीर कर्करोगाशी इरफान यांनी लढा दिला होता, मात्र काल त्यांची प्रकृती खालावली आणि आज उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अलीकडेच प्रदर्शित झालेला अंग्रेजी मिडीयम (Angrezi Medium) हा इरफान यांचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमाच्या निमित्ताने इरफान यांनी एक शेवटचा इंटरव्ह्यू दिला होता ज्यात त्यांनी आपण या आजाराशी लढत आहोत कारण एका व्यक्तीसाठी आपल्याला जगायची इच्छा आहे असे म्हंटले होते. ही व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नसून इरफान खान यांची पत्नी सूतापा (Sutapa Khan) होती. या मुलाखतीत इरफान खान यांनी शेअर केलेल्या अन्य आठवणी आज या प्रसंगी जाणून घ्या.. Irrfan Khan Dies: इरफान खान याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली; ट्विट करत व्यक्त केल्या भावना
इरफान खान यांचा शेवटचा Interview
इरफान खान यांनी मुंबई मिरर ला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला पत्नी सूतापा साठी जगायची इच्छा आहे असे म्हंटले होते, " सूतापा बद्दल मी काय सांगू, आजवरच्या या प्रवासात ती माझ्यासोबत होती, अजूनही 24/7 ती माझ्यासोबत असते. मी या आजाराला लढा देत आहे , जर का मला अजुन जगता आले तर मला तिच्यासोबत मला अजून जगायचे आहे." असे इरफान यांनी सांगितले होते. Irrfan Khan Dies: मुंबईच्या डब्बेवाल्यांनी त्यांचा 'लंच बॉक्स' सिनेमाचा सह अभिनेता 'इरफान खान'ला अर्पण केली आदरांजली!
इरफान खान यांचा शेवटचा सिनेमा अंग्रेजी मिडीयम च्या अनुभवाविषयी बोलताना त्यांनी सर्व टीमचे आभार मानले . मी आयुष्यभर या चित्रपटाच्या टीमचा ऋणी राहीन कारण या आजारात आणि इतक्या कठीण हवामानात मला शुटिंग करणे शक्य होईल का याविषयी शंका होती. पण टीम ने हे अगदी सोप्पे केले. त्यांच्या छोट्या मोठ्या कृतीतूनही त्यांनी मला आधार दिला म्ह्णूनच मी अधिक संवेदनशील झालो आहे. अंग्रेजी मिडीयम चे शूटिंग हा आतापर्यंतचा बेस्ट अनुभव होता. कधी कधी उदयपूर मध्ये शूटिंग करताना 48 डिग्री पर्यंत तापमान वाढायचे तर लंडन मध्ये तापमान अगदी 2 डिग्री पर्यंत खाली यायचे पण या एकूण वातावरणात सर्वात सुंदर अनुभव मिळाला होता. (इरफान खान यांच्या निधनावर अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, अरविंद केजरीवाल, सुप्रिया सुळे यांच्या सहित 'या' दिग्गजांनी व्यक्त केला शोक)
अभिनेता इरफान खान यांच निधन ;न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर ने होते त्रस्त- Watch Video
दरम्यान, इरफान खान यांनी केवळ बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूड मध्ये सुद्धा जुरासिक पार्क (Jurassic Park), लाईफ ऑफ पाय (Life Of Pie) सारख्या सिनेमातून त्यांनी आपली छाप पाडली होती. इरफान यांचा आजवर कमावलेला चाहता वर्ग खूप मोठा आहे. अभिनयाचे बॅकग्राउंड नसताना त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि टॅलेंटने चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली होती, आज त्यांच्या निधनाने ही जागा पोकळ झाली आहे. इरफान खान यांच्या स्मृतीस लेटेस्टली परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!