Bigg Boss Marathi 2, 31st July Episode 67 Preview: बिग बॉसचे सदस्यांना भावनिक गिफ्ट,आज होणार जवळच्या व्यक्तींची भेट
Bigg Boss Marathi 2: बिग बॉस (Bigg Boss) च्या घरात वावरताना अनेकदा भांडण, टास्क यामध्ये आपल्या भावना आड आल्यास खेळाकडे दुर्लक्ष होते, हे टाळण्यासाठी आपले इमोशन आटोक्यात ठेवणे गरजेचे असते. मागील साधारण 10 आठवड्यांपासून बिग बॉसच्या घरातील सदस्य शक्य तितक्या प्रॅक्टिकल पणे वागण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आजच्या भागात बिग बॉस तर्फे आखलेल्या एका टास्क मध्ये सद्यस्यांच्या अडगळीत ठेवलेल्या भावनांचा आणि दडवुन ठेवलेल्या अश्रूंचा बांध फुटतोच आणि मग घरात उरते ती केवळ स्तब्धता! Voot वर दाखवलेल्या प्रोमोनुसार, आज बिग बॉस सदस्यांसोबत Statue- Release चा गेम खेळणार आहेत.ज्यामध्ये आज घरातील सदस्यांना भेटण्यासाठी त्यांची खास जवळची व्यक्ती येणार आहे. पाहा काय घडणार आजच्या भागात?
आजच्या भागात टास्क सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व सदस्यांना याबाबत माहिती दिली जाते.बिग बॉस तर्फे आदेश आल्यावर सर्वांनी आहे त्या जागी स्तब्ध व्हायचे असून बोलण्याला सुद्धा मनाई करण्यात येते. यानंतर गार्डन एरिया मध्ये सर्वांमध्ये मजा मस्ती सुरू असते. तेव्हाच बिचुकले उठून कपडे बदलण्यासाठी घरात जातात पण त्यांनी टीशर्ट काढताच बिग बॉस फक्त त्यांनाच statue होण्यास सांगतात.पण यावेळेस सदस्यांना हुलकावणी देत घरात कोणीच येत नाही. त्यानंतर सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असताना अचानक नेहाचा पती नचिकेत हा घरात एक कविता म्हणत एन्ट्री घेतो आणि त्याचा आवाज ऐकताच नेहा पळत बाहेर येते पण तितक्यात बिग बॉस सर्वांना स्तब्ध होण्याचे आदेश देतात. शेवटी सर्वांची भेट घेऊन नाचिकेतला कन्फेशन रूमच्या मार्गाने बाहेर येण्यास सांगितले जाते. या दरम्यान नेहा फ्रीझ असल्याने तिची आणि नचिकेतची भेट होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा भागच पहावा लागेल.
दरम्यान, काल अभिजित केळकर हा घरातील नवा कॅप्टन निवडला गेल्याने या आठवड्यात सुरक्षित असणार आहे तर माधव याने मागच्या वीकेंड च्या डावात नेहाला सुरक्षित केले आहे. तसेच काल एका टास्कच्या निमित्ताने नेहा आणि अभिजितला आपल्याला हव्या त्या सदस्याला सेफ करण्याची पॉवर दिली गेली होती,ज्यामध्ये शिवानी, किशोरी आणि शिव हे घराबाहेर पडण्यापासून सुरक्षित झाले आहेत. तूर्तास समोर आलेल्या प्रोमोवरून तरी आजचा भाग हा भावनिक असणार आहे हे निश्चित!