Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या कार अपघाताचे मुख्य कारण आले समोर, हरिद्वारचे एसके सिंह यांनी दिली माहिती

ऋषभ पंतच्या अपघाताचे मुख्य कारण समोर आले आहे.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे मुख्य कारण समोर आले आहे. हरिद्वारचे एसपी एसके सिंह यांनी सांगितले की, तो स्वत: कार चालवत होता आणि ते एकटे होता. ऋषभ पंत आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रुरकीला जात होता. त्याला अचानक डुलकी लागल्याने हा अपघात झाला. त्यांची प्रकृती आता ठीक आहे.

पहा Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)