Viral Video: इंदूरमधील एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकले होते 8 लोक, उपस्थित लोकांनी काढले बाहेर, व्हिडीओ व्हायरल

इंदूरमधील एका इमारतीत पाचव्या मजल्यावर लिफ्ट आपोआप बंद पडल्याने गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये 8 लोक होते, बाहेर उभ्या असलेल्या लोकांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले. स्कीम क्रमांक 140 जवळ असलेल्या ग्रँड एक्झोटिक सनशाईन बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 8 जण लिफ्टमध्ये अडकले, त्यांना बराच वेळ मदत मिळू न शकल्याने अखेर बाहेर उभ्या असलेल्या काही लोकांनी त्यांना लिफ्टमधून बाहेर काढले.

Viral Video

Viral Video: इंदूरमधील एका इमारतीत पाचव्या मजल्यावर लिफ्ट आपोआप बंद पडल्याने गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये 8 लोक होते, बाहेर उभ्या असलेल्या लोकांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले. स्कीम क्रमांक 140 जवळ असलेल्या ग्रँड एक्झोटिक सनशाईन बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 8 जण लिफ्टमध्ये अडकले, त्यांना बराच वेळ मदत मिळू न शकल्याने अखेर बाहेर उभ्या असलेल्या काही लोकांनी त्यांना लिफ्टमधून बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्ट बंद पडल्यानंतर अडकलेल्या लोकांनी अनेकवेळा मदतीसाठी हाक मारली, मात्र इमारतीत सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांना कोणीही बाहेर काढले नाही. दरम्यान, बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी लिफ्टचा दरवाजा उघडला आणि एक एक करून सर्वांना बाहेर काढले. इमारती आणि अपार्टमेंटमधील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. हे देखील वाचा: Girl Beats Harasser With Shoe: मुलीची छेड काढणाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी बुटाने मारहाण, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

व्हिडिओ पहा:

याआधीही लहान मुले आणि लोक लिफ्टमध्ये अडकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इमारत व्यवस्थापनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. @Reenu_SY या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now