Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात 4 ते 7 जुलैपर्यंत पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याने (IMD) गुजरात, ओडिशा आणि झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या आणि मध्यम पावसासह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
मान्सूनने (Rain) देशात दस्तक दिली असून नैऋत्य मान्सून पसरला आहे. या कारणास्तव, बहुतांश भागात पावसाचे वृत्त आहे. हवामान खात्याने (IMD) गुजरात, ओडिशा आणि झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या आणि मध्यम पावसासह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) चेन्नई आणि उपनगरात पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
शनिवारी हवामान खात्याने सांगितले की, दिल्लीत पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत रविवारी दिवसाची सुरुवात प्रसन्न सकाळने झाली आणि किमान तापमान 26.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा दोन अंश सेल्सिअसने कमी आहे. हवामान खात्याने याआधीच दिवस मुख्यतः ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता वर्तवली होती.
दुसरीकडे, अनेक राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस पडणार असल्याने हवामानात बदल होऊन नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुढील पाच दिवस गुजरात, कोकण, गोवा, किनारपट्टी कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, कराईकल आणि माहे येथे मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हेही वाचा Maharashtra Politics: शिवसेना भवन येथे आज जिल्हाप्रमुखांची बैठक
त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 4 ते 7 जुलैपर्यंत पाऊस पडेल. हवामान खात्यानुसार, कर्नाटकच्या अंतर्गत भागात 5 ते 7 जुलै दरम्यान पाऊस पडेल. कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य भारताच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे.
त्यानुसार छत्तीसगडमध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल, तर विदर्भात 5 ते 7 जुलै दरम्यान पाऊस पडेल. दुसरीकडे, पूर्व मध्य प्रदेशात 4 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. झारखंड, सिक्कीम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यासोबतच ओडिशामध्ये 3 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल.