Shiv Jayanti 2026 Tithi Nusar Date: शिवजयंती 2026 तिथीनुसार,जाणून घ्या तारीख, वेळ आणि तिथीनुसार शिवजन्मोत्सवाचे महत्त्व

2026 मध्ये तिथीनुसार शिवजयंती 6 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. या लेखात फाल्गुन वद्य तृतीया तिथीची वेळ आणि तारखेनुसार होणाऱ्या उत्सवाचे सविस्तर तपशील दिले आहेत.

शिवजयंतीचे घोषवाक्य मराठीत

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी दोन वेळा उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या १९ फेब्रुवारी या अधिकृत तारखेनुसार शिवजयंतीचा सोहळा नुकताच पार पडला असला, तरी अनेक शिवभक्त हिंदू पंचांगानुसार (तिथीनुसार) हा उत्सव साजरा करण्यास प्राधान्य देतात. २०२६ मध्ये तिथीनुसार शिवजयंती शुक्रवार, ६ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.

फाल्गुन वद्य तृतीया: तिथी आणि वेळ

हिंदू पंचांगानुसार, शिवरायांचा जन्म शालिवाहन शक १५५१ मधील फाल्गुन वद्य तृतीयेला झाला होता. पंचांग गणनेनुसार, २०२६ मध्ये ही तिथी ६ मार्च रोजी येत आहे.

तारीख: ६ मार्च २०२६

वार: शुक्रवार

तिथी: फाल्गुन वद्य तृतीया

या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शिवनेरी किल्ल्यासह महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर शिवजन्मोत्सवाचा पाळणा गायला जाईल.

दोनदा शिवजयंती का साजरी होते?

शिवजयंती साजरी करण्याबाबत शिवप्रेमींमध्ये दोन मुख्य मतप्रवाह आहेत. राज्य सरकारने इतिहास तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख अधिकृत मानली आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर आणि सार्वजनिक सुट्टी म्हणून १९ फेब्रुवारीला जयंती साजरी होते. दुसरीकडे, पारंपरिक संघटना आणि आध्यात्मिक विचार मानणारे अनुयायी हिंदू कालगणनेनुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी मानतात. यामुळे दरवर्षी तारखेनुसार आणि तिथीनुसार असे दोनदा शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement