National Education Day 2020 Messages: राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त खास Wishes, SMS, Images, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन

दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांच्या स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.

National Education Day 2020 (File Image)

दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांच्या स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील शिक्षणाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावणारे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म याच दिवशी 11 नोव्हेंबर 1888 झाला होता. 11 सप्टेंबर 2008 रोजी मानव संसाधन विकास मंत्रालयाने 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

मौलाना आझाद यांनी उर्दू, पर्शियन, हिंदी, अरबी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. सोळा वर्षांत यांनी त्याने सहसा 25 वर्षांत घेतले जाणारे सर्व शिक्षण प्राप्त केले होते. तर अशा या राष्ट्रीय शिक्षण दिनादिवशी मौलाना आझाद यांनी देशाबरोबरच शिक्षण जगासाठी दिलेले अमूल्य योगदान आठवले जाते. हा दिवस भारतामधील क्शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा आहे, म्हणूनच Wishes, SMS, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून तुम्ही या खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: Children's Day 2020: बालदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील खरं कारण)

विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली

नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!

National Education Day 2020

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात

विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

National Education Day 2020

ज्ञान ही शक्ती आहे, माहिती मुक्त आहे

प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक समाजात शिक्षण

प्रगतीचा एक भाग आहे

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!

National Education Day 2020

शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,

जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!

National Education Day 2020

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

National Education Day 2020
शिक्षण म्हणजे

फक्त वही-पेन नव्हे

तर बुध्दीला सत्याकडे,

भावनेला माणूसकीकडे,

शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा! 

National Education Day 2020

दरम्यान, सर्व शिक्षण अभियानासह भारतातील शिक्षणासाठी अनेक मोहिमा राबविल्या जातात. सरकार आता प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमधील मुलांना मोफत शिक्षण देत आहे आणि आपल्या देशातील शिक्षणाची पातळी सतत वाढवत आहे. या सर्वांमध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले गेलेले मौलाना अबुल कलाम यांचे फार मोठे योगदान आहे. म्हणूनच त्यांना 1992 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement