नागपूर: अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर बलात्कार; एका आरोपीस अटक, दुसरा फरार
या घटना अनुक्रमे सीताबर्डी (Sitabuldi Police Station) आणि सक्करदरा पोलीस ठाणे (Sakkardara Police Station) हद्दीत घडल्या. दरम्यान, सीताबर्डी पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, दुसऱ्या घटनेतील आरोपी अद्याप फरार आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) शहरात बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. यातील पहिली घटना ही १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडली आहे. तर, दुसरी घटना एका महिलेसोबत घडली आहे. या घटना अनुक्रमे सीताबर्डी (Sitabuldi Police Station) आणि सक्करदरा पोलीस ठाणे (Sakkardara Police Station) हद्दीत घडल्या. दरम्यान, सीताबर्डी पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, दुसऱ्या घटनेतील आरोपी अद्याप फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार, राकेश हरीश शाहू (वय-23 वर्षे) असे पहिल्या घटनेतील आरोपीचे नाव आहे. हा आरोपी केटरींग उद्योगात काम करतो. पीडिता ही आपल्या मैत्रिणीकडे चित्रपट पाहायला गेली होती. चित्रपट पाहून आपल्या घरी परतत असताना आरोपीने तिला रस्त्यात आडवले. तसेच, बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे आरोपीने या बलात्कार करताना पीडितेसोबत अश्लिल चित्रिकरण केले. घडल्या प्रकाराची जर कुठे वाच्यता करशील तर, हा व्हिडिओ फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. मात्र, घरी परतल्यावर पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पीडितेने आपल्या आईजवळ कथन केला. त्यानंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. आलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, दुसरी घटना सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणातील आरोपीचे नाव प्रकाश हटवारी लाडे( वय - ३२ वर्षे, रा. आर्वी नाका) असे आहे. प्राप्त माहितीनुसरा, प्रकाश लाडे आणि पीडिता यांची एका रुग्णालयात 2017 मध्ये भेट झाली होती. भेट झाली तेव्हा पीडिता एका रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. आरोपीच्या मित्राच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ही ओळख पुढे मैत्री आणि प्रेमात बदलली. (हेही वाचा, विरार: मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एक आरोपी अटकेत)
प्रेमाचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले व तिच्यावर वारंवार बलात्कार केला. हे प्रेमसंबंध पीडितेच्या घरच्यांनाही माहिती होते. आरोपीने आपण आपल्या मुलीशी लग्न करणार असल्याचे पीडितेच्या कुटुंबियांना सांगितले होते. आरोपीने एकदा पीडितेच्या कुटुंबीयांकडे (आई-वडील) आर्थिक मागणी केली होती. त्या वेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला आपला होणारा जावई समजून ३७ हजार रुपये दिले. मात्र, आता आरोपीने पीडितेसोबत विवाह करण्यास नकार दिला. आरपीचा नकार पाहून पीडितेने पोलिसांत तक्रार दिली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)