तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेटमधील भूकंपामुळे या भागात मोठे धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चायना भूकंप नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, एव्हरेस्ट क्षेत्राचे उत्तर प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिंगरी या ग्रामीण काउंटीमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
...