ग्रीसच्या सॅंटोरिनी बेटावर सुमारे एक आठवड्यापासून भूकंपांची मालिका सुरूच आहे. रिसॉर्ट बेटावर येत असलेल्या भूकंपानंतर ग्रीसच्या सरकारने गुरुवारी सँटोरिनीमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. बुधवारी रात्री बेटावर ५.२ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपानंतर नागरी संरक्षण मंत्रालयाने आणीबाणी जाहीर केली आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांना तेथे तातडीने आवश्यक कारवाई करण्यास मदत होईल.
...