पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनाजवळ रस्त्याच्या कडेला बॉम्बचा स्फोट झाल्याने किमान चार जवानांचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी गुरुवारी ही माहिती दिली. दुसऱ्या घटनेत, खैबर पख्तुनख्वा (केपी) प्रांतातील तिराह व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केलेला मोर्टार रस्त्याजवळ पडल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. मात्र, अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
...