बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी सांगितले की, हमासकडून सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी मिळेपर्यंत गाझामधील युद्धबंदी लागू होणार नाही. यानंतर, आता हमासने यादी सादर केली आहे. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8:30 वाजता युद्धबंदी लागू होण्याच्या एक तास आधी त्यांनी एका निवेदनात पुन्हा एकदा इशारा दिला.
...