मुसळधार पावसामुळे सौदी अरेबियातील पवित्र मक्का आणि मदिना या पवित्र स्थळांना पूर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी, ६ जानेवारी रोजी एकाच दिवसात ४९.२ मिमी पाऊस पडल्याने दोन्ही पवित्र शहरांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. या नैसर्गिक आपत्तीचा फटका शहरांना बसला असून, तेथील विमानतळ, रुग्णालयेही पाण्याखाली गेली आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
...