दुबईत एका टॅक्सी ड्रायव्हरने एका महिला प्रवाशाला अयोग्य टिप्पणी केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम युजर एनएसए थॉमसने हे फुटेज शेअर करत दावा केला आहे की, ड्रायव्हरने तिला तिच्या सेक्स लाईफबद्दल स्पष्ट प्रश्न विचारून अस्वस्थ केले. ड्रायव्हरने विचारले, "तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत किती वेळा सेक्स केला आहे?" आणि मग थेट प्रश्न विचारला कि, "आज रात्री तुम्ही सेक्स केला नाही का?" हि धक्कादायक बाब समोर आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
...