दक्षिण कॅलिफोर्नियातील फुलर्टन शहरात गुरुवारी एक छोटे विमान एका व्यावसायिक इमारतीच्या छतावर कोसळले आणि त्यात दोन जण ठार तर १८ जण जखमी झाले. फुलर्टन पोलिसांच्या प्रवक्त्या क्रिस्टी वेल्स यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या धडकेमुळे इमारतीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले.
...