मॅडिसनचे पोलिस प्रमुख शॉन बार्न्स यांनी या घटनेत मारल्या गेलेल्या लोकांबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, तरीही त्यांनी सांगितले की, ॲबंडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. या शाळेत सुमारे 390 विद्यार्थी शिक्षण घेतात. पोलिसांनी यापूर्वी एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान, हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
...