सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तुम्ही सर्वांनी आजपर्यंत हत्तीची अनेक व्हिडिओ पाहिले असतील. दरम्यान, एका मॉडेल हत्तीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तामिळनाडूतील एक हत्ती सध्या त्याच्या हेअरस्टाईलमुळे इंटरनेट चर्चेत आहे. मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरात राहणारा सेंगमालम येथील हा हत्ती त्याच्या बॉब कट हेअरस्टाईलमुळे ओळखले जातात आणि त्याला बॉब-कट सेंगमलम म्हणून संबोधले जाते.
...