ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता भारतही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील १८ वर्षांखालील मुलांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. सोशल मीडियावर १८ वर्षांखालील मुलांचे अॅक्टिव्हिटी रोखण्यासाठी सरकार लवकरच नवा कायदा आणू शकते. या कायद्यानुसार आता १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट (डीपीडीपी), २०२३ अंतर्गत नियमांचा मसुदा तयार केला आहे.
...