नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदी नियुक्ती ची घोषणा ९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून ते जानेवारी 2022 मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे एस. सोमनाथ यांची जागा घेतील. सुमारे चार दशकांचा अनुभव आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानासह नारायणन यांच्या नियुक्तीमुळे भारतीय अंतराळ कार्यक्रमाला नवी दिशा आणि गती मिळाली आहे. व्ही. नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ असून भारताच्या अंतराळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
...