⚡कॉग्निझंटने फ्रेशर्सना ऑफर केले वार्षिक 2.5 लाख रुपयांचे पॅकेज; नेटीझन्सनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली
By Prashant Joshi
कॉग्निझंट आयटी कंपनीने 2024 बॅचच्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी 2.5 लाख रुपये वार्षिक वेतन जाहीर केले. ही रक्कम भारताच्या आयटी क्षेत्रात साधारणपणे दिल्या जाणाऱ्या 3.5 लाख ते 4 लाख रुपयांच्या सरासरी वार्षिक पगारापेक्षा खूपच कमी आहे.